मशिद, दर्गा आणि इमामवाडा

विविध धर्म-जाती-पेशे आणि संस्कृतींना जोपासणारा आपला देश खरंतर मंदिरांचा देश म्हणायला हवा!
रस्त्यावरून जाताना चटकन नजरेत भरणारं कोणतंही मंदिर आपल्याला विशिष्ट समूहांचा प्रभाव ठळकपणे दर्शवतं. तसंच ते त्या त्या भागातल्या धार्मिक पर्यटनातही मोलाची भूमिका बजावत असतं…
अशावेळी कधीतरी दुसऱ्या धर्माबद्दल सहज नवल वाटलं तर स्वतःला कुठल्या ‘इजम’ च्या चौकटीत बसवायची गरजच काय!!?

आज ‘जुम्मे कि रात’पासून ते ‘कून फाया कून’पर्यंत, निरनिराळ्या माध्यमातून, सणावारांतून आणि दूरवरून कानांवर पडणाऱ्या अजानच्या बुलाव्यातून इस्लाम धर्माच्या खुणा अनुभवायला मिळतायत… बारीक कोरीव नक्षीकाम, कोरलेल्या रेखीव पर्शियन ओळी, बलाढ्य दरवाजे, मिनार, घुमट, कारंजी, महाल ते थडग्यांपर्यंत, मुघलांच्या वर्चस्वादरम्यान बांधलेल्या वास्तू वारसा स्थळांत जपल्या जातायत…


म्हणून, धार्मिक तेढीपलीकडे जात श्रद्धास्थानं म्हणून इस्लामिक प्रार्थन स्थळांकडं नजर फिरवूयात….

मिनार

नवीन भूमी जिंकली कि आपल्या सावभौमत्वाची ओळख करून देण्यासाठी आणि धर्माचा प्रसार करत मुल्ला-मौलवींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मुघल राज्यकर्त्यांनी मोठमोठ्या मशिदींची स्थापना केली.
मशीद म्हणजे मुसलमानांचं प्रार्थनास्थळ.
प्रेषित मुहम्मदाचं घर ही सगळ्यात पहिली मशिद समजली जाते.
आपला देश सर्वाधिक मशिदींचा नॉनइस्लामिक देश म्हणूनही गणला जात असल्याचा सर्व्हे आहे.

मिनार मशिद मुहम्मद अली रोड, मुंबई.


कुठल्याच चिन्ह, मूर्ती, चित्रांच्या स्वरूपात इथे अल्ल्लाह दिसत नाही.
वेगवेगळ्या अरबी स्थापत्याचा अनोखा मेळ साधणाऱ्या मशिदींच्या सभागृह रचनेत (इवान) मध्यभागी असलेला डोम (घुमट) स्वर्गाचं प्रतीक दर्शवतो.
जिथं बघून मुस्लिम नमाज पठण करतात ती ‘किबला’ दिशा दाखवणारी भिंत (मिहरब), देवाला साद घालण्यासाठी या असा बुलावा देण्यासाठी (अजान) बांधलेल्या उंचच उंच ‘मिनार ‘

ते स्त्रियांसाठीची ‘मखफिल’ नामक स्वतंत्र खोली यात असतात.
शुक्रवारच्या महत्त्वाच्या प्रार्थनेसाठी एकच प्रमुख मशिद असते जिला ‘जामा म्हणतात.

जामा ईदगाह


आणि अशाच जामा मशिदीच्या परिसरात ईद वेळी शेकडोंच्या समूहाला पठण करता यावं म्हणून जो ऐसपैस आवार असतो त्याला ‘ईदगाह’ संबोधतात.
कित्येकदा इस्लाम अंतर्गत मोडणाऱ्या विविध शाखांसाठी स्वतंत्र मशिदीही बांधलेल्या दिसतात.

हाजी अली दर्गा, मुंबई

सुफी परंपरेत ख्याती मिळवलेल्या संतांच्या देवस्थानाला ‘दर्गा’ म्हणतात.
संत परंपरेला आणि मनुष्यरूपी पूजनाला इस्लाम धर्मात स्थान नसल्यानं दर्ग्यापाशीच मशीद असं चित्र दिसत नाही.
गायन-नर्तनाच्या माध्यमातून कव्वाल्यां, संतांच्या पालखीच्या यात्रांचं आयोजन करत दर्गा शांतता-मानवतावादाचा प्रसार करतात.

‘सुन्नी’ पाठोपाठ ‘शिया’ या इस्लामिक शाखेचा विस्तार होऊ लागल्यावर आपल्या देशात इमामवाड्यांची निर्मिती झाली. धर्मासाठी कर्बाळाच्या

युद्धात बलिदान देणाऱ्या इस्लामचा तिसरा इमाम हुसेनच्या स्मरणार्थ मुहर्रम वेळी इथे दुखवटा व्यक्त करतात. लखनऊ शहरातला भूलभुलैया नावाने ओळखला जाणारा ‘बडा इमामवाडा’ थक्क करून सोडतो!

Published by bha2pa

Real Places, Real People, Real Stories. Bharatiya Touring Party (Bha2Pa) a Marathi creator page travels in all possible directions to explore travel destinations, communities, cultures, tastes and life across the globe. BhaDiPa Contact Emails Below! For Business Enquiries: brandsolutions@gulbadantalkies.com For Social Media Queries: socialmedia@gulbadantalkies.com For Live Events: live@gulbadantalkies.com For Internships and Jobs: jobs.bhadipa@gmail.com For Stand-Up Comedians: smsbhadipa@gmail.com For Writers: bhadipa.writers@gmail.com For Actors: casting.bhadipa@gmail.com Other General Enquiries/Collaborations: bha2pa@gmail.com

Design a site like this with WordPress.com
Get started